मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी मनगटावर घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते अभिनया बरोबर समाजकार्यात सुद्धा चांगलेच सक्रीय आहेत.
काही दिवसांपासून ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अजित पवारांनी प्रभाकर मोरे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. यावेळी त्यांना कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. अजित पवारांनी पत्रकार परिषेदेत याबद्दलची घोषणा केली.