पनवेल (संजय कदम) : रोटरी क्लब ऑफ पनवेल तर्फे “रोटरी पनवेल महोत्सव २०२२” चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाचे वर्ष हे रोटरी पनवेल महोत्सव चे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यामुळे हे महोत्सव यशस्वी करण्याची दुहेरी काटेरी जबाबदारी रोटेरियन व प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र मोरे यांच्यावर टाकण्यात आली होती आणि राजेंद्र मोरे यांनी हि जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. न भूतो न भविष्यतो व रौप्य्महोत्सवी वर्षाला साजेशा असा महोत्सव यंदाचा ठरला.
२३ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या दरम्यान रोटरी क्लब ऑफ पनवेल तर्फे “रोटरी पनवेल महोत्सव २०२२” चे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवसीय चाललेल्या या फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागातील वस्तूंचे स्टॉल होते, तसच लहान मुलांसाठी अमुस्मेंट पार्क होते. स्थानिक तसेच गरजू महिलांना उद्योग संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे स्टॉलच्या बरोबरीने १० च्या १० दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे स्थानिक कलाकारांना देखील एक हक्काचं व्यासपीठ रोटरीनी उपलब्ध करून दिले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डॉ शोभना पालेकर यांनी विशेष मेहनत घेतली आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल गेली 25 वर्ष हा फेस्टिवल भरवतोय त्यामागील उद्देश हा विविध सामाजिक उपक्रम असतो, म्हणूनच फेस्टिवलचं ब्रीदवाक्य देखील “हॅव फन फॉर चॅरिटी” असे आहे. यंदाचे रोटरी फेस्टिवल उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र मोरे यांच्यासह रो. संतोष अंबावणे, रो. किरण परमार, रो. नितीन मुनोथ, रो. राजाभाऊ गुप्ते, रो. श्याम जहागीरदार, रो. शिरीष पिंपळकर, रो. योगेश जोशी यानी विशेष मेहनत घेतली.