महाराष्ट्रात कोरोनाचा कहर जारी, 24 तासात 10,441 नवी प्रकरणे, 258 लोकांचा मृत्यू

मुंबई/ठाणे/कल्याण/भाईंदर : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाही. राज्यात रविवारी कोरोनाची 10,441 नवी प्रकरणे समोर आली आणि 258 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 6,82,383 झाली आहे. ज्यामध्ये 4,88,271 रूग्ण बरे झाले आहेत, 1,71,542 सक्रिय प्रकरणे आहेत.

रविवारी 11,749 रूग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सोबतच बरे झालेल्या रूग्णांची संख्या 4,88,271 झाली आहे. महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचा दर 71.62 पेक्षा जास्त आहे, तर मृत्युदर 3.26 टक्के आहे. राज्यात 12,30,982 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर 34,820 लोक क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 36,16,704 नमूण्यांची तपासणी करण्यात आली आहे.

ठाण्यात 1284 नवी प्रकरणे
ठाणे जिल्ह्यात कोविड-19 ची 1,284 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर रविवारी जिल्ह्यातील संसर्गाची प्रकरणे वाढून 1,13,884 झाली.

कल्याण शहरात आतापर्यंत सर्वाधिक 26,405 प्रकरणे समोर आली आहेत. तर ठाण्यात 24,329 आणि मीरा भाईंदरमध्ये 11,519 प्रकरणे समोर आली आहेत. जिल्ह्यात संसर्गातून बरे होण्याचा दर 85.97 टक्के आहे, तर मृत्युदर 2.85 टक्के आहे.

मुंबईत 991 नवी प्रकरणे
मुंबईत रविवारी कोरोनाची एकुण 991 नवी प्रकरणे समोर आली. 24 तासात कोरोनाच्या एकुण 1235 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 34 रूग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोना रूग्णांची एकुण संख्या आता 1,36,348 झाली आहे. येथे अ‍ॅक्टिव्ह केस आता अवघ्या 18,565 आहेत. 1,10,069 रूग्ण बरे झाले आहेत आणि एकुण 7,419 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.