महाराष्ट्रात संक्रमितांचा आकडा 8 लाखांच्या पुढे, पुणे देशात सर्वाधिक प्रभावित शहर

मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत एकुण संक्रमितांचा आकडा 8 लाखांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी 15 हजार 675 नवी प्रकरणे समोर आली. आतापर्यंत राज्यात 8 लाख 08 हजार 306 रूग्ण संक्रमित झाले आहेत. आतापर्यंत 24 हजार 903 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात रिकव्हरी रेट लागोपाठ वाढत आहे. सध्या रिकव्हरी रेट 72.32% आहे.

पुणे देशातील सर्वात प्रभावित शहर
कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुणे देशातील सर्वात प्रभावित शहर झाले आहे. 1.75 लाख पेक्षा जास्त संक्रमितांसह पुण्याने दिल्लीला मागे टाकले आहे. ऑगस्टच्या सुरूवातीला 91,903 रूग्णांसह पुणे संक्रमित शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर होते, परंतु, एका महिन्यात येथे सर्वात जास्त 83 हजार रूग्ण वाढले.

देशात मंगळवारी कोरोना संक्रमितांची संख्या 37 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 37 लाख 69 हजार 524 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. देशात मागील 24 तासांत 78 हजार 357 नवे रूग्ण वाढले. मंगळवारी 1,045 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर, 62 हजार 146 रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला आहे.