पनवेल : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे तर्फे सर्व शिक्षकांकरिता शिक्षणदिनी शनिवार, दि. ५ सप्टेंबर, २०२० रोजी आभासी प्रशिक्षण आयोजित केलेला आहे.
आजच्या डिजिटल युगात दैनंदिन जीवनाप्रमाणेच शिक्षण क्षेत्रात देखील विविध ऑनलाईन टूल्सचा वापर सातत्याने वाढत आहे. शिक्षणक्षेत्रात सुद्धा कोविड-१९ मुळे अनुभवास आलेली व भविष्यातही डोके वर काढू शकेल अशी टाळेबंदीची अनिश्चितता लक्षात घेता विविध ऑनलाईन टूल्सचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. या बदलांमुळे शिक्षकांना आकर्षक प्रेझेंटेशन बनवणे, व्हीडीओ रेकोर्डिंग करणे, ऑनलाईन टूल्स वापरून प्रश्नमंजुषा तयार करणे, गुगल मिट व वेबीनार यासारख्या अनेक डिजिटल स्किल्सची गरज भासत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा या सर्व गोष्टींचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे.
म्हणूनच आता नवीन शैक्षणिक प्रणाली आत्मसात करून व डिजिटल स्किल्स वापरून शिक्षणास सहजरित्या अधिक माहितीपूर्ण व आनंददायी कसे बनवता येईल हा एक मोठ्ठा प्रश्न सर्व शिक्षकांसमोर आहे. विशेषतः सध्या उदभवलेल्या ताळेबंदीच्या च्या परीस्थितीत जास्तीत जास्त ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करणे उपयुक्त ठरत आहे हे मागील काही महिन्यात आपण अनुभवलेच असेल. विविध स्मार्ट टीचिंग स्किल्स व डिजिटल टूल्स शिकणे हे सर्व शिक्षकांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. म्हणूनच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) तर्फे शिक्षक दिना निमित्त दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी सर्व शिक्षकांसाठी एक ऑनलाईन फेसबुक सेशन आयोजित करण्यात येत आहे. हे सेशन विनामुल्य आहे.
सदर फेसबुक सेशनमध्ये शिक्षकांसाठी उपयुक्त असलेल्या स्मार्ट टीचिंग स्किल्स व डिजिटल स्किल्स कशा अवगत करता येतील हे सांगितले जाईल, जेणेकरून आपल्या शिक्षकांना डिजिटल स्किल्स वापरून त्यांची शैक्षणिक कामे कमीत कमी वेळात व अत्यंत प्रभावीपणे करता येतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एंगेजिंग कंटेंट जसे प्रेझेंटेशन, व्हीडीओ, इत्यादी च्या माध्यमातून स्मार्ट टीचिंग टेक्निक्स वापरून प्रभावीपणे कसे शिकवता येईल याबद्दल एमकेसीएल च्या प्रतिनिधींकडून माहिती दिली जाईल.
या फेसबूक सेशनचा हेतू असा आहे की, आपल्या भागातील शिक्षकांना २१व्या शतकाशी सुसंगत अशी कौशल्ये आत्मसात करता येतील आणि त्याद्वारे अधिक चांगल्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीला चालना देण्यास मदत होईल.
फेसबूक सेशन दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११ वाजता सुरु होईल. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, कोकण विभाग चे समन्वयक श्री. जयंत भगत यांनी केले आहे.
सत्राचा तपशील खालीलप्रमाणे
दिनांक: शनिवार, ०५ सप्टेंबर २०२०
वेळ: सकाळी ११ वाजता
माध्यम: फेसबुक
लिंक: www.mkcl.org/live