पेण (राजेश प्रधान) : १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन जागतिक एड्स प्रतिबंध सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रायगड व ठाणे जिल्ह्यात संस्थे मार्फत विविध प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत तपासणी शिबिरे, पथनाट्य, रॅली, गुणगौरव इत्यादी कार्यक्रमाच्या अंतर्भाव आहे. कार्यक्रमांचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंड यांच्या नेतृत्वात लिंकवर्कर प्रकल्प रायगडचे प्रकल्प व्यवस्थापक- पंकज पाटील, ट्रकर्स प्रकल्प पजेएनपीटी उरणचे समुपदेशक आनंद पाटील, ट्रकर्स प्रकल्प भिवंडी ठाण्याचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कर्मचारी वृंद कार्यरत आहे.
या कामी महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्था , मुंबई व जिल्हा प्रतिबंध कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग व ठाणे येथील संजय माने व रतन गाढवे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.