मुंबई (शांताराम गुडेकर) : बृहन्मुंबई महानगर पालिका एन वॉर्डच्या अधीपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम परिसरात वास्तव्यास असलेले श्री.यशवंत वि. खोपकर, सुधीर शिंदे यांनी इसमास पकडून पोलीसांच्या हवाली केले व आपले कर्तव्य चोखपणे बजावले त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यशवंत खोपकर हे संध्या टाटा टेक्नो अंधेरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यारत आहेत. तसेच आयोजक प्रवीण विटेकर व सतीश खामकर यांच्यावतीने प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिव दीपा भिसे उपस्थिति होत्या.
श्री. यशवंत खोपकर यानी चोर पकडून दिले. त्यामुळे होणारी वित्तहानी व जिवित हानी यांचे रक्षण केले. त्यांनी कर्तव्य म्हणून आपल्या परीने निस्वार्थ सेवाकार्य केले आहे. करीत आहेत याचा अभिमान आहे अशा शब्दांत कौतुक करत यशवंत खोपकर व सुधीर शिंदे यांचा म. सु. र. गौरव- २०२२ देऊन गौरव करण्यात आला.या दोघांचा सत्कार झाला म्हणून विभागातील अनेक नागरिक तसेच म. सु. मंडळ पदाधिकारी, सदस्य तसेच सुरक्षा रक्षक यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.