महिलांनी सुद्धा केली पाहिजे ट्रायसेप्स एक्सरसाइज, जाणून घ्या पद्धती

वर्कआऊटच्या बाबतीत पुरूष , महिलांच्या समानच आहेत. सध्या महिला सर्वप्रकारचे बॉडी वर्कआऊट करत आहेत, जेणेकरून त्यांचे शरीर फिट बनवता येईल. जर तुम्हाला सुद्धा ट्रायसेप्सवर वर्कआऊट करायचे आहे तर रोज केवळ 10 मिनिटे ट्रायसेप्सला द्या.

यासाठी डंबेल्स आणि बॉडीवेट एक्सरसाइजशिवाय अन्य काही एक्सरसाइज करण्याची गरज आहे. यातून तुम्ही तुमचे हात मजबूत करू शकता. आज आम्ही अशा एक्सरसाइज बाबत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही चांगले ट्रायसेप्स बनवू शकतो.

1 ट्रायसेप्स डिप्स

दोन्ही हात मजबूत आणि टोन करण्यासाठी ट्रायसेप्स पुशअप्स उपयुक्त आहेत. ही एक्सरसाइज करण्यासाठी एक बेंचची आवश्यकता आहे. ट्रायसेप्स पुशअप्स करण्यासाठी प्रथम बेंचच्या पुढे या. आता आपले दोन्ही हात बेंचवर ठेवा आणि खुर्चीवर बसण्याच्या स्थितीत या. याच स्थितीत थांबा. यानंतर कोपरा झुकवून आपले शरीर तोपर्यंत खाली ठेवा, जोपर्यंत तुमचे हात 90 डिग्री कोण बनवत नाहीत. लक्षात ठेवा की, या एक्सरसाइजमध्ये तुमचे हात आणि खांदे अगदी सरळ राहिले पाहिजेत.

2 ट्रायसिप किकबॅक
ट्रायसिप किकबॅक केल्याने दंडांसह मांड्यासुद्धा मजबूत होतात. ट्रायसिप किकबॅक एक्सरसाइज करताना आपल्या डाव्या हातात डंबेल पकडा आणि उजव्या हाताने बेंच पकडा. आता आपल्या डंबेलला आपल्या छातीच्या दोन्हीकडे आणणासाठी कोपरा दुमडा. नंतर श्वास सोडत डावा हात मागच्या बाजूला घेऊन जा. नंतर छातीकडे घेऊन जा. अशाप्रकारे सुमारे 15 वेळा करा. यांनतर दुसर्‍या हाताने सुद्धा असेच करा.