महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्यामुळं आता मुलांना, विद्यार्थ्यांना मिळणार हक्काची मैदानं

mahendra-gharat.4
उरण (विठ्ठल ममताबादे) : सिडको व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून 50 ते 60 वर्ष आस्तित्वात असलेल्या प्रकल्पग्रस्त युवकांच्या मैदानावर रहिवाशी घरांसाठी इमारती उभारून सर्व गावांची पारंपारीक मैदाने गिळंकृत केली तर काही NMSEZ यांच्या घशात घातली. त्यामुळे युवकांना खेळण्यासाठी मैदानेच शिल्लक नाहीत.
सिडको नियोजन विभागाने शाळांसाठी आरक्षित भुखंडासमोर मैदानांचे आरक्षण करून कॉमन प्ले ग्रांउडची रचना नोडल मध्ये केली. परंतु, शैक्षणीक संस्थानी वॉल कंपाऊंड घालून ही मैदाने संस्थेच्या मालकीसाठी ताब्यात घेतली, सिडकोचे हे धोरण चुकलेले आहे. सिडको विमानतळ, न्हावा शिवडी मार्ग, नेरूळ – उरण रेल्वे, आर. आर. पॅकेज यासाठी भूसंपादन करताना सिडको व्यवस्थापनास सोबत चातुर्याने वाटाघाटी करून सगळ्या प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई विमानतळाप्रमाणे साडेबावीस टक्केचे पॅकेज मिळवून देत कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघर,कोपर, गव्हाण या गावांना नवीन खेळांची मैदाने तयार करून घेतली.
तर बामणडोंगरी , मोरावे, जावळे, धुतुम, पागोटे, कोटनाका, बोकडविरा,गावांसाठी आश्वासन दिल्या प्रमाणे NMSEZ मधील मैदाने आरक्षित करावी म्हणून सिडको नियोजन, भूसंपादन, इंजिनियरिंग, सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत वरील गावांचा संयुक्तिक पाहणी दौरा करून ही मैदाने सोडावित म्हणून सिडको व्यवस्थापनाला सांगितले आहे.
महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्यामुळे आता मुलांना, विद्यार्थ्यांना हक्काची मैदाने मिळणार असल्याने जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे.
उरण पनवेल आदी तालुक्यातील लहान मुलांना, शाळा कॉलेज मधील मुलांना खेळण्यासाठी, विविध स्पर्धेसाठी मैदानांची नितांत गरज असून मैदाने नसल्याने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटत आहे. विद्यार्थ्यांचा शाळेत मानसिक,बौद्धिक विकास होतो. मात्र खरा शारीरिक विकास हा मैदानावरच होतो. विविध स्पर्धा, खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मैदाने असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक गावांना मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. तरी अनेक गावांना मैदाने उपलब्ध नसल्याने त्यासाठी महेंद्र घरत यांनी पुढाकार घेतला असून लवकरच अनेक गावांना मैदाने उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *