महेंद्र शेठ घरत यांनी दि. बा. पाटील यांना वाहिली आदरांजली

mahendra-gharat.5
उरण (विठ्ठल ममताबादे) : समाजामध्ये कार्य करत असताना राजकारणामध्ये येणारे अनेक नेते आपण पाहिले त्यामधील एक नेता उरण तालुक्यातील जासई या भूमीमध्ये जन्म घेऊन अतिशय गरिबीतून पुढे येऊन जनतेसाठी काम करत पाच वेळा आमदार ,दोन वेळा खासदार, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले होते.
आपलं संपूर्ण आयुष्य स्वतःसाठी काही न कमवता जनतेसाठी वेचलं ते प्रकल्पग्रस्तांचे नेते, गोरगरिबांचे कैवारी आणि रायगड वाशियांचे आधारस्तंभ स्वर्गीय दी बा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना आपले आदर्श मानणारे त्यांचे विचार समाजामध्ये पोचवत असताना कामगारांना, कष्ट करणाऱ्या आणि जनतेला न्याय देणारे नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी स्वर्गीय दि बा पाटील यांना त्यांच्या जन्म गावी जासई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *