नवी दिल्ली : माजी अर्थ सचिव राजीव कुमार यांना नवे निवडणूक आयुक्त बनवण्यात आले आहे. ते अशोक लवासा यांची जागा घेतील. अशोक लवासा यांनी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता. राजीव कुमार यांच्या नियुक्तीसंबंधी विधी व न्याय मंत्रालयाने शुक्रवारी नोटिफिकेशन जारी केले. लवासा 31 ऑगस्टला आपला कार्यभार स्वीकारतील.
राजीव कुमार 1984 बॅचचे झारखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मागच्या वर्षी जुलै महिन्यात अर्थ सचिव पदाचा भार सांभाळला होता आणि या वर्षी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. पीएम मोदींची महत्वाकांक्षी योजना जन धन योजना आणि मुद्रा योजनेची प्रमुख जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
सुनील अरोरा भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त आहेत. अशोक लवासा यांच्याशिवाय दुसरे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आहेत. कुमार 10 दिवसानंतर या वरिष्ठ अधिकार्यांच्या टीममध्ये सहभागी होतील. हे तीनही अधिकारी पीएम मोदी यांचे विश्वासू आहेत.