मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचे दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांचं मुलुंड मधील फोरटीज रुग्णालयात निधन झाले.
एक अत्यंत अभ्यासू, परखड व शिक्षण चळवळीतील आत्यंतिक तळमळ असलेल्या गुरुतुल्य व्यक्तीला आपण गमावले असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील मंडळीनी दिली आहे. कोकण मतदार संघातून दोन वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले होते.
शिक्षण व शिक्षकांसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. विधान परीषदेत आवाज उठविणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, उपोषण करणे आदी संविधानिक मार्गाने त्यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. आपल्या 12 वर्षाच्या आमदारीच्या कारकिर्दीत त्यांनी आदर्शवत काम केले.