“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागोठणे प्रा.आ.केंद्र सज्ज वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांची माहिती

नागोठणे (महेश पवार) : सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे. यासाठी संपूर्ण राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावे तसेच वाड्यांमधील प्रत्येक व्यक्तीची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन, त्यासाठी नागोठणे प्रा. आ. केंद्र सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली.

राज्य शासनाकडून आलेली ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही मोहीम नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या २३ ग्रामपंचायतींमधील ५७ गावे तसेच ८२ वाड्यांमध्ये राबविण्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची संपूर्ण माहिती देण्यासाठी आरोग्य केंद्रात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी नागोठणे आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत कर्जेकर, हिरामण डोलकर,आरोग्य सेविका सौ.म्हात्रे सिस्टर, गट प्रवर्तक सौ.प्रतिभा पोटफोडे, सौ.शेडगे यांच्या सह एकूण ५७ आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी माहिती देतांना सांगितले की, केंद्रातील आरोग्य सहाय्यक यांच्या देखरेखीखाली गट प्रवर्तक यांच्या मदतीने आशा सेविकांची चार ते पाच पथके तयार करण्यात येणार आहेत.हि पथके आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहेत.यावेळी या सेविका आरोग्य विषयक मूलभूत योग्य ती माहिती देणार आहेत. तसेच यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कोणा व्यक्तीला आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात येणार आहेत. अशी माहितीही यावेळी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली.

कोरोनाचे संकट वाढत असताना जनतेचे आरोग्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन आता कोरोना विरोधातील लढाईत ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वसामान्यांना सहभागी करून घेत आहेत. या मोहिमेंतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी या बैठकीत करण्यात आला. 
 
दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विरुद्धच्या या लढ्यात स्वसंरक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्य विषयक अगदी लहान मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोठेही बाहेर जाताना तोंडाला मास्क वापरणे, गर्दीच्या जाणे टाळावे, वारंवार हात धुणे, बंदीस्त जागेऐवजी मोकळी हवा असणाऱ्या ठिकाणी थांबावे, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना काळजी घ्यावी आशा अनेक महत्त्वाच्या सूचना देखील यावेळी डॉ.चेतन म्हात्रे यांच्या कडून देण्यात आल्या. तसेच १६ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम नागोठणे परिसरातील गावांमध्ये व वाड्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ.म्हात्रे यांच्या कडून सांगण्यात आले आहे. नागोठणे (महेश पवार) : सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे.  यासाठी संपूर्ण राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावे तसेच वाड्यांमधील प्रत्येक व्यक्तीची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन त्यासाठी नागोठणे प्रा. आ. केंद्र सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली.

राज्य शासनाकडून आलेली ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही मोहीम नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या २३ ग्रामपंचायतींमधील ५७ गावे तसेच ८२ वाड्यांमध्ये राबविण्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची संपूर्ण माहिती देण्यासाठी आरोग्य केंद्रात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी नागोठणे आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत कर्जेकर, हिरामण डोलकर,आरोग्य सेविका सौ.म्हात्रे सिस्टर, गट प्रवर्तक सौ.प्रतिभा पोटफोडे, सौ.शेडगे यांच्या सह एकूण ५७ आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी माहिती देतांना सांगितले की, केंद्रातील आरोग्य सहाय्यक यांच्या देखरेखीखाली गट प्रवर्तक यांच्या मदतीने आशा सेविकांची चार ते पाच पथके तयार करण्यात येणार आहेत.हि पथके आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहेत.यावेळी या सेविका आरोग्य विषयक मूलभूत योग्य ती माहिती देणार आहेत.तसेच यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कोणा व्यक्तीला आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात येणार आहेत. अशी माहितीही यावेळी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली.

कोरोनाचे संकट वाढत असताना जनतेचे आरोग्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन आता कोरोना विरोधातील लढाईत ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वसामान्यांना सहभागी करून घेत आहेत. या मोहिमेंतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी या बैठकीत करण्यात आला. 
 
दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विरुद्धच्या या लढ्यात स्वसंरक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्य विषयक अगदी लहान मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोठेही बाहेर जाताना तोंडाला मास्क वापरणे, गर्दीच्या जाणे टाळावे, वारंवार हात धुणे, बंदीस्त जागेऐवजी मोकळी हवा असणाऱ्या ठिकाणी थांबावे, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना काळजी घ्यावी आशा अनेक महत्त्वाच्या सूचना देखील यावेळी डॉ.चेतन म्हात्रे यांच्या कडून देण्यात आल्या. तसेच १६ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम नागोठणे परिसरातील गावांमध्ये व वाड्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ.म्हात्रे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.