माटवण मोहल्ला येथील बसथांबा आणि अंतर्गत गटाराचे उदघाटन

palkar16

पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील माटवण मोहल्ला येथील बस थांबा व अंतर्गत गटाराचे उदघाटन पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे यांच्याहस्ते करण्यात आले.

माटवण मोहल्ला येथील बस थांबा व अंतर्गत गटाराचे उदघाटनप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई एकनाथ गायकवाड, माटवण ग्रामपंचायत सरपंच शंकर सागवेकर, बोरावळे ग्रामपंचायत सरपंच वैभव चांदे, उपसरपंच दिघे, युवा कार्यकर्ते समीर चिपळूणकर, यासीन करवेलकर, प्रमोद दादा शिंदे, निलेश मोरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्थानिक कार्यकर्ते नासीर नाडकर,इम्रान येळूनकर, आमिर नाडकर, गफार नाडकर,मजीद नाडकर, समीर नाडकर, मुसदीक नाडकर,सलमान नाडकर, अदनान नाडकर, हसन मिया नाडकर, शौकत नाडकर, मुतलीब नाडकर,अब्दुल रजाक तुडीलकर, फायज काझी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.