माणगांव (रविंद्र कुवेसकर) : वनवासी कल्याण आश्रम महाराष्र्ट संचलित, माणगाव येथिल कै.सौ.विजया गोपाळ गांधी आश्रम शाळेची ‘मुंबई दर्शन’ शैक्षणिक सहल शनिवार दिनांक ०७ जानेवारीला आयोजित करण्यात आली. कोरोना कालावधी नंतर प्रथमच मुलांना सहलीचे विशेष कुतूहल होते. मुलांनी न पाहीलेलं व आर्थिकदृष्टीने परवडणारे ठिकाण म्हणजे मुंबईचे दर्शन सहलीचे सुनियोजीत आयोजन करण्यात आले.
सहलीमध्ये २७ मुले, १७ मुली, व ०४ शिक्षक सहभागी झाले. शनिवार दिनांक ०७ जानेवारी रोजी सहलीची बस माणगांवहुन पहाटे ठिक ०५ . ०० वाजता मुंबईकडे रवाना होत ९:०० वा बस चेंबुरमध्ये पोहोचली. सहलीचे स्वागत करण्यासाठी आधी पासुनच संस्थेचे कार्यकर्ते विजयराव पटवर्धन, राजेशजी चौळंगी, हेमंतजी वरळीकर, गिरीशजी इडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. राणीची बाग, बागेतील प्राणी, पक्षी पाहून आश्रम शाळेतील मुलांनी मनमुराद आनंद लुटला. त्या नंतर गेटवे ऑफ इंडिया, ताज हाॅटेल, इंडिया गेट व समुद्रातील मोठमोठी जहाजे पाहून मुले मंत्रमुग्ध झाली. मुलांना खुप आनंद वाटला.
नेहरू सायन्स सेंटर या ठिकाणी गेल्यानंतर सवलत दरात तिकिटं मिळविणे,पार्किंग व्यवस्था करणे मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करणे इत्यादी नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आधीच केले होते. संध्याकाळी परतीच्या वेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्क मैदान, दादर चौपाटी, चैत्यभुमी आदि ठिकाणे मनभरुन पाहीली. दादर येथील कल्याण आश्रमाच्या कार्यालयातही सर्व विद्यार्थ्यांना नेण्यात आले. त्या ठीकाणी सर्व मुलांना महेश्वरी प्रगती मंडळ मुंबई यांच्या माध्यमातुन ३०० ताटं, ३०० ग्लास, ३०० टाॅवेल मंडळाच्या अध्यक्षा मिनुजी सोनी मॅडम यांच्या शुभहस्ते शाळेला भेटवस्तू देऊन संध्याकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था कार्यालयामार्फत जयंतजी अभ्यंकर, मंगलाताई कुलकर्णी खारघर यांचे सौजन्याने करण्यात आली.
संघटनेसाठी वेळ बुध्दी,श्रम कौशल्य व वेळप्रसंगी पैसा खर्च करणारी व स्वत:पेक्षाही संघटनेला महत्व देणाऱ्या कार्यकर्त्याकडुन अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. ही सहल यशस्वी करण्यासाठी पडद्यामागील खरे सुत्रधार पंकज पाठक, सुशील जाजू यांनी तसेच वेळोवेळी फोन करून मार्गदर्शन करणारे जयंत अभ्यंकर, रवी पाटील, कोचरेकर अप्पा, सहलीचे मार्गदर्शक शालेय समिती अध्यक्ष जाधव, तसेच सर्व भोजन, नास्ता, तिकीट व्यवस्था, वनवासी मुलांच्या खिशाला चाट पडु नये यासाठी काळजी घेणारे मुंबई महानगरीतील कल्याण आश्रमाच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक अरुण गणू पाटील, आश्रमशाळा माणगांव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. प्रवासाचा कोणताही त्रास न होता सहल निर्वीघ्न पार पडुन शनिवारी रात्री ठीक १२:३० वा. माणगांव मुक्कामी सुखरूप पोहोचली.