माणगांव नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मानवी हक्क दिन’ उत्साहात साजरा

mangav
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी हक्क संरक्षण कायद्या मधील कलम १२ अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे.
या कायद्या अंतर्गत समाजातील तळागाळा पर्यंत जनतेला मानवी हक्कांचे ज्ञान माहीत होणे व त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून माणगांव नगरपंचायत प्रशासनामार्फत शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता माणगांव शहरांत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माणगांव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार व मुख्याधिकारी संतोष माळी, उप-नगराध्यक्ष सचिन बोंबले, पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता, नगर सेवक दिनेश रातवडकर, स्वीकृत नगरसेवक हेमंत शेठ, ज्युनियर इंजिनियर आकाश बुवा, कार्यालयीन निरिक्षक रामदास पवार, सिटी को-ऑर्डीनेटर अतुल जाधव तसेच अशोक दादा साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी जाधव, मिलींद गायकवाड, यांच्या उपस्थितीत नगरपंचायत महिला व पुरुष कर्मचारी, शिक्षकवृंद व शालेय विद्यार्थ्यांनी मानवी हक्क दिनाचे जनजागृतीपर फलक घेऊन माणगांव शहरात प्रभातफेरी काढुन मोठ्या उत्साहात “मानवी हक्क दिन” साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *