माथेरानकरांना गॅस साठी करावी लागते दिवसभर प्रतीक्षा, माल वाहतुकीदारांच्या दुर्लक्षाने माथेरानकर त्रस्त

matheran-hourse
माथेरान (मुकुंद रांजाणे) :  माथेरानमध्ये येथील महिलांना गॅस टाकीसाठी संध्याकाळपर्यंत वाट पहावी लागत असून गॅस पुरवठा करणाऱ्या मालवाहतूक घोड्यांच्या दुर्लक्षामुळे माथेरान करांवर ही पाळी आली असून किमान गॅस करता तरी वाहन मिळावे अशी मागणी माथेरान मधील महिलांकडून आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
 माथेरानमध्ये गॅस वाहतूक हा मागील काही दिवसांपासून कळीचा मुद्दा ठरलेला आहे. गॅस वाहतुकीसाठी वाहन व्यवस्था करण्यास प्रशासन कमी पडत असल्याने त्याचा भार मात्र येथील स्थानिक भोगत असून एका टाकीमागे चक्क दीडशे ते दोनशे रुपये जास्त मोजत आहेत व इतके पैसे मोजून ही गॅस ची टाकी घरपोच केली जात नाही पण ह्याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही मागील काही दिवसांपासून माथेरान मधील स्थानिक नागरिकांना वेळेमध्ये गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत याबद्दल गॅस वितरणाचे कर्मचारी यांना विचारले असता दस्तुरी येथून मालवाहतूक करणाऱ्या घोडेव्यवसायिक यांच्यामुळे माथेरान करांना गॅस उशिरा मिळत असल्यामुळे गॅस वितरणास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या माथेरान कर नेरूळ ते माथेरान न यासाठी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर साठी 90 रुपये अतिरिक्त मोजत आहे तर वाणिज्य गॅस सिलेंडर साठी 140 रुपये इतका जादाचा दर आकारला जातो, माथेरान मध्ये एक हजार पेक्षा जास्त घरगुती गॅस जोडणे आहेत तर वाणिज्य गॅस टाक्या या हॉटेल व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लागत असतात त्यामुळे रोजच माथेरानला 70 ते 80 टाक्यांचा पुरवठा होत असतो परंतु या टाक्या पुरवणारे घोडे व्यवसाय हे संध्याकाळी या टाक्या पुरवत असल्याने महिलांना गॅस अभावी मोठ्या प्रमाणात त्रासास सामोरे जावे लागत आहे.
पुरवठा करणाऱ्या घोडे व्यवसायिकांना पैसे वाढवून हवे असल्यामुळे ते पुरवठा सर्वात शेवटी करत असल्याचे गॅस वितरणाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे माथेरान मध्ये सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जात असून त्यांचा माल सर्वप्रथम  वाहतूक केला जातो व त्यानंतर स्थानिकांच्या जीवनावश्यक असलेला गॅस टाकी पुरवठा केला जातो त्या मुळे येथील महिलांना गॅस टाकीच्या प्रतीक्षेत दिवसभर उभे राहावे लागते त्यामुळेच माथेरान मधील सर्व महिलांनी किमान गॅस साठी तरी वाहन व्यवस्था व्हावी व सर्वांना कमी दरामध्ये गॅस उपलब्ध होईल यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *