माथेरान (मुकुंद रांजाणे) : ज्या गावात सुस्थितीत रस्ते असतात त्या गावाचा विकास हा हमखास प्रगतीपथावर असतो त्याप्रमाणे सध्या माथेरान मधील अनेक वर्षांपासून रेंगाळलेली रस्त्यांची कामे एमएमआरडीए च्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू असल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या रेस्टॉरंट, स्टॉल्स तसेच अन्य खाद्य पदार्थ दुकाने चपलांच्या दुकानात धुळीच्या त्रासाने अक्षरशः व्यापारी वर्गासह नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते. ओबडधोबड समपातळी नसलेल्या रस्त्यावर चालताना अनेकांना पायदुखी, कंबरदुखी सारख्या आजारांनी ग्रासले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांमुळे धूळविरहित रस्त्यावर चालताना एक वेगळाच आनंद पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.त्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
—————————
खुप वर्षांनंतर बाजारपेठ मधील रस्ता उत्तम प्रकारे क्ले पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने पूर्ण केला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागणार नसून दुकानातील मालाचे नुकसान होणार नाही. या रस्त्याच्या कामांत ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या प्रशासकीय अधिकारी नक्कीच दूर करतील असा आम्हाला व्यापारी वर्गाला विश्वास आहे.
—राजेश चौधरी, अध्यक्ष व्यापारी संघटना माथेरान
—————————
पर्यावरण पूरक रस्त्याच्या कामांमुळे मुख्य रस्त्याला एक चांगला लूक आलेला असून पर्यटकांना बाजारात वस्तू खरेदी करताना आनंद मिळणार आहे. धुळविरहित रस्त्यांमुळे मालाच नुकसान क्षमणार असल्याने मुख्यत्वे व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या सुंदर रस्त्यांमुळे बाजारपेठेच्या सौंदर्यात भर पडणार आहे.