माथेरानच्या ई-रिक्षांवर दगडफेक; अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल

matheran-rikshaw
माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक निर्णय ठरलेल्या ई-रिक्षा या सध्या माथेरान मध्ये सुरू आहे परंतु काल रात्री या रिक्षावर येथील एका अवघड वळणावर काही अज्ञात व्यक्तीनी दगडफेक केली होती.
 दि.२३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ई रिक्षा चालक संजय हरिभाऊ बांगरे रिक्षा क्रमांक आठ एम एच 46 बीपी 3606 या ई रिक्षा मधून दस्तुरी नाका इथून माथेरानच्या दिशेने पॅसेंजर घेऊन येत असताना कोणी अज्ञात इसमाने आर टू आर फोर या रिक्षातील चालक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल अशा बेदरकारपणे व हयगयीने ई-रिक्षावर दगड मारण्याची कृती केली होती.
ज्यामध्ये सुदैवाने रिक्षा चालक थोडक्यात बचावला परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये याकरिता या रिक्षा चालविणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे एपीआय  शेखर लव्हे तसेच ठाणे अंमलदार महेंद्र राठोड हे करीत आहेत.
माथेरानमध्ये ई रिक्षा सुरुवात झाल्यापासून येथे ई रिक्षास प्रखर विरोध होत आहे स्थानिक अश्वपाल संघटनेने रिक्षास विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच रिक्षावर दगडफेक प्रकरणाला वेगळे वळण लागत असून ही बाब माथेरान पोलीस गांभीर्याने घेऊन सदर अज्ञात इसमाचा तपास करीत आहेत.
————————————-
या दगडफेकी मागे मोठा कट असण्याची शक्यता असून कोणत्याही प्रकारे रिक्षाचा अपघात घडवून आणून ही रिक्षा माथेरान साठी कशी धोकादायक आहे हे दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सध्या तरी दिसून येत आहे.
—प्रकाश सुतार, उपाध्यक्ष श्रमिक हात रिक्षा संघटना,माथेरान
————————————-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सध्या प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू आहेत. या सेवेमुळे सर्वांना लाभ होत आहे.परंतु काही अज्ञात व्यक्तींनी या रिक्षावर केलेल्या दगडफेकीचा प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्ही अशा कृतीचा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनाने लवकरच अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
—-शकील पटेल, अध्यक्ष श्रमिक हातरीक्षा संघटना माथेरान
————————————-
दोन वेळा असे दगडफेकीचे प्रकार घडलेले आहेत. त्या अज्ञात व्यक्तींचा हाच उद्देश असावा की ई रिक्षाच्या चालकांना त्रास दिल्यास आणि जखमी केल्यास हे चालक काम करणार नाहीत.यापुढे अशा दगडफेकीच्या घटना घडू नयेत.
–हरिश्चंद्र पारधी, ई-रिक्षा चालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *