माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानमध्ये आज नगरपालिकेकडून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नगरपालिका उत्पन्नातून राखीव 5टक्के निधी माथेरानमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी वाटप करण्यात येतो त्याचे वाटप आज माथेरानचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे- शिंदे यांच्या हस्ते पालिकाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये करण्यात आले .
माथेरानमध्ये दिव्यांग व्यक्तींची संघटना असून या संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना आपल्या अस्तित्वासाठी लढा देत असून त्यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 33 जणांना अपंगत्वाचे सर्टिफिकेट मिळाले आहे व इतर सूविधानसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
दुपारी येथील कम्युनिटी सेंटर येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून चेंबूर येथील आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर तसेच स्वर्गीय मीनाक्षी तमिळ आमुदन यांच्या स्मरणार्थ माथेरान शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी दोन व्हीलचेअर, दोन वॉकर, पाच हँडस्टिक व दोन कोमोड स्टूल यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी दीव्यांग संघटना अध्यक्ष चंद्रकांत जाधव,भाजपा शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ उपाध्यक्ष किरण चौधरी माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी प्रदीप घावरे ,संदीप कदम,राजेश चौधरी,जनार्दन पारटे,सुभाष भोसले व भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते)
Related