माथेरान (मुकुंद रांजाणे) : जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रम वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यालय आणि प्राचार्य गव्हाणकर विद्यालय यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जागतिक मानवी हक्क दिन
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे, वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर, माथेरान प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, माथेरान या दोन्हीही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे (शिंदे) यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी संविधान त्याचप्रमाणे मानवाने माणसाशी कशी वर्तणूक केली पाहिजे आपले आचार ,विचार,समाजात आपली वर्तणूक आणि सामाजिक बांधिलकी जोपासताना आपली काय जबाबदारी असते आपले कर्तव्य पार पाडत असताना जनहितार्थ जी सेवा घडते त्यातूनच अंतरी समाधान प्राप्त होते.असे अनमोल विचार यानिमित्ताने प्रशासक सुरेखा भणगे, शिक्षक संघपाल वाठोरे, दिलीप अहिरे यांनी नमूद केले. याप्रसंगी सुत्र संचालन संघपाल वाठोरे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक रमेश ढोले यांनी केले.
यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप आहिरे,सचिन भोईर, अनिश पाटील, साक्षी कदम,गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, रमेश ढोले, दिनेश बागवे, विदुला गोसावी यांसह नगरपरिषदेचे कर्मचारी,अधिकारी राजेश रांजाणे, प्रविण सुर्वे, अंकुश इचके, अजय साळूंखे,जयवंत वर्तक, सदानंद इंगळे, अन्सार शेख, अभिमन्यू येळवंडे, वनिता डिघे, परिचारिका गोळे,शालेय विद्यार्थी, नगरपरिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकवृंद,नागरिक, पालकवर्ग उपस्थित होते.
Related