माथेरान( मुकुंद रांजाणे) : प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेत 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या नाटूकल्या तयार करून सादर केल्या. काही विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या पोशाखात आलेल्या होत्या. सावित्रीबाईंच्या जीवनातील महत्वाच्या घटना नाट्य रुपात दाखविल्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली.
या प्रसंगी शिक्षक संघपाल वाठोरे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनातील विविध पैलू विद्यार्थ्याना उलगडून सांगितले. सावित्रीबाई तत्कालीन समाजात सुद्धा पुरोगामी होत्या याची उदाहरणे दिली. शिक्षिका विदुला गोसावी यांनी सावित्रीबाईंच्या लुगड्याची गोष्ट मुलांना सांगितली तर शिक्षक रमेश ढोले यांनी आपण महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेणे गरजेचे आहे असे नमूद केले.
Related