माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब कोतवाल यांची ११० वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे( शिंदे) यांच्या शुभहस्ते सकाळी आठ वाजता हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरपरिषदेचे शिपाई अर्जुन पारधी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकं येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण, स्वातंत्र्य सैनिकांच्या शिल्पास प्राचार्य शांताराम गव्हाणकर शाळेचे शिक्षक रमेश ढोले आणि नगरपरिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून गावातून मशाल फेरी नौरोजी उद्यानापर्यंत काढण्यात आली.हुतात्मा भाई कोतवाल यांच्या निवासस्थानी मेघा कोतवाल यांच्या हस्ते भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण,नौरोजी उद्यानातील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला प्रशासक सुरेखा भणगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास कार्यालय अधीक्षक प्रवीण सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषदेच्या शाळेतील आवारात सुभेदार कै. विनय धनावडे यांच्या शिल्पास सारिका धनावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला नगरपरिषदेचे रोखपाल राजेश रांजाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली. आजी माजी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर शाळेचे शिक्षक वृंद, शालेय विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.हुतात्मा भाई कोतवाल,गोपाळराव शिंदे, भाऊसाहेब राऊत यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी तीनही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.