माथेरान (मुकुंद रांजाणे) : भारत मातेला दास्यमुक्त करण्यासाठी ज्या १०५ राष्ट्रवीरांनी आपले बलिदान दिले त्यापैकीच एक माथेरानचे वीर सुपुत्र हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल यांची २ जानेवारी रोजी ८० वी पुण्यतिथी माथेरानमध्ये साजरी करण्यात आली.
पहाटे साडेपाच वाजता नौरोजी उद्यानापासून हुतात्मा भाई कोतवाल यांच्या घराजवळून मशाल फेरी काढण्यात आली. सकाळी ०६-०२ मि.नौरोजी उद्यानात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याचे समोर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे (शिंदे) यांच्या शुभहस्ते पुण्यज्योत प्रज्वलित केल्यानंतर त्यांच्या शुभहस्ते भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला नगरपरिषदेचे आस्थापना लिपिक जयवंत वर्तक यांच्या हस्ते पुष्पहार, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास आवक जावक लिपिक अजय साळुंके यांच्या हस्ते पुष्पहार, वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य सैनिक सुभेदार कै. विनय धनावडे यांच्या शिल्पास सारिका धनावडे यांच्या हस्ते पुष्पहार,हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेस तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत यांच्या हस्ते पुष्पहार ,हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शिल्पास उमेश मोरे व संदेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, प्रेरणा सावंत, अजय सावंत,आकाश चौधरी, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रकाश सुतार, प्रदीप घावरे,राजेश चौधरी,राकेश चौधरी,वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव,भास्कर शिंदे, निखिल शिंदे, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक प्रवीण सुर्वे, अभियंता स्वागत बिरंबले,लेखापाल अंकुश इचके,आरोग्य विभागाचे अभिमन्यू येळवंडे, अन्सार शेख, शिक्षक संघपाल वाठोरे, दिलीप अहिरे, मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे, मुख्याध्यापिका कल्पना पाटील,विदुला गोसावी,सचिन भोईर, दिनेश बागवे,अनिश पाटील यांसह गावातील ठराविक नागरिक ज्यांना वीर हुतात्म्यांच्या बलिदाना बाबतीत संवेदना आहेत त्या मंडळीने उपस्थिती दर्शवली.एकंदरीत या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रशासक सुरेखा भणगे यांनी उत्तम प्रकारे केले.