माथेरान : पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील नागरिकांना पाण्यावाचून तीन दिवस काढावे लागल्याने येथील जल प्राधिकरणाच्या कारभाराबाबत लोकांमध्ये संताप दिसून येत आहे.
तीन दिवसांपूर्वी वीजवाहिनी खराब झाल्याने शार्लोट लेक येथील पम्पिंग स्टेशन बंद पडले. तसेच जुम्मापट्टी येथील पम्पिंग स्टेशनमधील पंप नादुरूस्त झाल्याने माथेरानमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास उशीर लागल्याने पावसातही माथेरानकरांचे हाल झाले होते.
अद्याप शार्लोट लेक येथील वीजपुरवठा सुरळीत झालेला नसून, नेरळ येथून येणारे पाणी जल प्राधिकरणाच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर काम केल्याने सुरू झाले. मंगळवारी तीन दिवसांनंतर येथे पाणी आले.