माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाळा व माजी विद्यार्थ्यांचे एकत्रित सांस्कृतिक गुणदर्शन २०२२ कार्यक्रम शुक्रवार दि.१६ आणि शनिवार दि.१७ रोजी सायंकाळी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असून वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर, प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर आणि सेंट झेव्हियर या तीन शाळांचा सहभाग आहे.
या कार्यक्रमासाठी अधिक्षक दीक्षांत देशपांडे आणि गव्हाणकर शाळेचे विश्वस्त शशिभूषण गव्हाणकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची प्रमुख अतिथी लाभली. या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील आणि सेंट झेव्हियर स्कुलच्या मुख्याध्यापिका पावलीना यांनी सर्व पालक वर्ग आणि नागरिकांना आमंत्रित केले आहे.
सुरू वातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्तवन करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.