माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले दोन पोलिसांचा नवी मुंबई येथील महासंचालक कार्यालयात “गुणात्मक अन्वेशनासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” या साठी सन्मानित करण्यात आले.
माथेरान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अरविंद ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल दामोदर खतेले यांना काल नवी मुंबई येथे त्यांनी राज्यात गाजलेल्या माथेरान मधील महिलेचा धडा विना शरीराच्या खून खटल्याचा बारा तासांच्या आत छडा लावण्यात दाखविलेल्या प्राविण्य साठी गौरविण्यात आले .
मा. विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले यावेळी नेरळ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनाही सन्मानित करण्यात आले.