माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात नवोदित कार्यकर्त्यांचा भरणा वाढताना दिसत आहे.
आज कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, माजी उप सभापती मनोहरशेठ थोरवे, माथेरान शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, उप शहरप्रमुख प्रमोद नायक, नरेश परदेशी, युवा सेनेचे गौरंग वाघेला यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माथेरान मधील संत रोहिदास नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण सोळा कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने,बिनशर्त कसलीही अभिलाषा न बाळगता जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये किशोर कदम, नितेश कदम,जगदीश कदम,सचिन काळे,दीपक सोनावणे,आकाश कांबळे,अतुल कारंडे,गणेश माने,शशिकांत माने,राजू वर्पे,उमेश कदम,ओंकार ननावरे,प्रसाद सोनावणे,सूर्यकांत सोनावणे,प्रवीण कांबळे,महेश काळे यांनी प्रवेश केला आहे.
चंद्रकांत चौधरी यांच्याकडे गावातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारे हे निस्वार्थी असून त्यांच्या अंगी नेतृत्व आणि पक्षाला उभारी देण्याचे कर्तृत्व आहे. त्याचप्रमाणे उप शहरप्रमुख प्रमोद नायक हे सुध्दा मदतीला धावून येतात. त्यामुळेच त्यांच्या या कार्यपद्धती वर खुश होऊन आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे नवोदित प्रवेश धारकांनीं सांगितले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटात विविध प्रभागातील कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून आगामी काळात नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये याचा नक्कीच फायदा होईल.आणि भगवा निश्चितच फडकेल असा विश्वास चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
———————————
गेली २० वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निस्वार्थीपणे काम करत होतो. परंतु माजी नगरसेवक स्वर्गीय दयानंद डोईफोडे होते तोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित आणि सुरळीत होते आम्ही ज्यांना निवडून दिले त्यांनी फक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या तरुणांकडे कोणीही लक्ष दिल नाही सतत डावललं जात होत तरुणांना योग्य नेतृत्व नसल्यामुळे आम्ही सर्वांनी एकमतांनी चंद्रकांत चौधरी व प्रमोद नायक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
—-नितेश कदम, संत रोहिदास नगर सक्रिय कार्यकर्ते माथेरान