माध्यमिक विद्यालय ऐनघर – कानसई येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

dinesh4
सुकेळी (दिनेश ठमके) : नागोठणे जवळच असलेल्या श्रीमती. गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालय ऐनघर – कानसई येथे भारताचा ७२ वा. प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कु. जान्हवी सुनिल हारपाल हिच्या हस्ते सकाळी ८ वा. ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, समूहगीत, सादर केल्यानंतर कानसई गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, स्वतंत्र भारताचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रभातफेरी विद्यालयात गेल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी स्थानिक शाळा कमिटी अध्यक्ष महेंद्र ढाणे , ग्रा. प. सदस्या प्रज्वली भोईर, मनोहरभाई सुटे, आधार फाऊंडेशनचे संचालक तथा भाजपाचे दक्षिन रायगड जिल्हा अध्यक्ष नामदेव वाघमारे, संतोष पवार, वाकण टॅपचे पोलिस उपनरीक्षक परशुराम भोईर,  मुख्याध्यापक अनिल वाघ, सर्व शिक्षक ,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.