पनवेल (संजय कदम) : दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केल्याने आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकाना बाहेर टाकून पळ काढण्याची घटना पनवेल शहरात घडली आहे .
मुस्तकीम नुरुल तरफदार ( वय ५१ ) यांचे जैन मंदिरा जवळ एम . एम . ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. सदर दुकानात ते बसले असतांना दोन अनोळखी इसम ग्राहक बनून त्यांच्या दुकानात आले व सोन्याचे दागिने पहात असताना अचानकपणे एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्न दोघांनी केला असता दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केल्याने आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकाना बाहेर टाकून पळ काढण्याची घटना घडली आहे. याची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
———————-
पनवेल परिसरातील लोक संख्या वाढत असल्याने ग्राहक वर्ग सुद्धा वाढला आहे. अश्या वेळी या भुरट्या चोरांचे फावते तरी दुकानदारांनी सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे पोलिसांचे सहकार्य व्यापारांना नेहमी असते तरी पोलिसांची गस्त या भागात वाढल्यास अश्या चोरांना आळा बसेल.