उरण (विठ्ठल ममताबादे) : जिद्द, चिकाटी, मेहनत व दृढ आत्मविश्वास असेल तर नक्कीच यश आपल्या पायाशी लोळण घालते. याचा प्रत्यय अविरत चित्रपटला आला आहे. कलाकारांच्या आयुष्यातल्या पहिल्या चित्रपटाने त्यांना मानसन्मान मिळवून दिला दिला. तो चित्रपट म्हणजे अविरत. या चित्रपटाचे निर्माते कु.मिलिंद म्हात्रे यांना आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 मध्ये सिल्लोड संभाजीनगर येथे झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात बेस्ट फिल्म डायरेक्टर या अवॉर्डने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुलजी सत्तार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे सर्वेसर्वा भिकानजी कांबळे,राजू कांबळे, श्रीमती अनिता साळवे,उमेशजी निकाळजे , सुभाषजी शिंदे या कार्यक्रमाचे निवेदक सुभाषजी तायडे पाटील, या पुरस्कार समितीचे सर्व ज्युरी मेंबर,सर्व डायरेक्टर व सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.
6 मे 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या पहिल्याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने अविरत या चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कमी वयात या निर्मात्याने मिळवलेले यश हे निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यामुळे रायगड वासियांच्या वतीने तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई,सोलापूर, नवी मुंबई व इतर जिल्ह्यातून या निर्मात्याचे भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या सोहळ्यात या चित्रपटाचे सहनिर्माते राजेश पवार , पवार मॅडम या चित्रपटातील गरीब मुलाच्या भूमिकेतील मुख्य कलाकार कुमार शुभम होळकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.