मुंबईत रुग्णवाढीचा दर मंदावला

मुंबई : मुंबईत रुग्णवाढीचा  दर ०.९० टक्के झाला . एकूण २४ पैकी ४ विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरवर असून २ विभागांत तो नव्वदवर, ६ विभागांत ८० वर, तर ५ विभागांत ७० वर आहे. रुग्णवाढीचा  दरही २४ पैकी १८ विभागांत १ टक्क्यापेक्षा कमी आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे.

३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीत १ लाख, तर १ जूनला २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठण्यात आला. १ लाख ते २ लाख हा टप्पा गाठण्यासाठी २५ दिवस लागले. त्यानंतर २४ जूनला ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला. ४ जुलैला ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला. २९ जुलैला ५ लाख चाचण्या झाल्या. ४ लाख ते ५ लाख चाचण्यांचा टप्पा १५ दिवसांमध्ये गाठला

प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. या  कामगिरीमुळे ८८,२९९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून २१,३९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील २४ वॉर्डांत वॉररूम सुरू केल्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड, तत्काळ औषधोपचार शक्य झाले. ज्यामुळे मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसते.