मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने संचारबंदीचा आदेश काढला आहे.
मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार असून ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ मुंबईत लागू राहण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे.