पेण (सुनील पाटील ) : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण शहरालगत असणाऱ्या एचपी पेट्रोल पंपात अपुऱ्या सुविधा व वाहनांच्या पेट्रोल , डिझेल ,व (CNG ) भरण्यासाठी पेट्रोल पंपा पासून महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर ब्रिजच्या बांधकामामुळे आता सदरचा रस्ता हा अरुंद झाला आहेे यामध्ये बाहेरून येणाऱ्या गाड्या पेट्रोल, डिझेल व सीएनजी भरण्यासाठी एचपी पेट्रोल पंप मध्ये येत असतात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते ब्रीज वरुन जाणाऱ्या एखाद्या लहान किंवा अवजड वाहनाचा ताबा सुटल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते
तसेच या एचपी पेट्रोल पंप मध्ये काम करणारे कामगार मास व सॅनिटायझरचा वापर करत नसल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती आहे. या पंपामध्ये हवा भरण्याची सुविधा , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे यासंदर्भात मनसेचे रा. जि. विद्यार्थी सचिव रूपेश पाटील यांनी एचपी पेट्रोल पंप यांना विनंती अर्ज केला आहे.
यावेळी येत्या दोन दिवसात आम्ही पंपावर लागणाऱ्या सुविधा सुरू करू असे तेथील मॅनेजर यांनी सांगितले. येत्या पाच दिवसात या पेट्रोल पंप मध्ये आवश्यक सुविधा सुरक्षा रक्षक, कामगारांना मास व सॅनिटायझर आणि पंपा बाहेर होणारी वाहतूक कोंडी याबाबत व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली आहे .अन्यथा मनसे स्टाईलने कार्यवाही केली जाईल असे रुपेश पाटील यांनी सांगितले.