मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा उच्छाद, आपघाताचा धोका वाढला

कोलाड (श्याम लोखंडे ) मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा रस्ता रोको अपघातांचा मोठा धोका वाढला असून मालक बेफिकीर असल्याने त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे .

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब सुकेळी खिंडीत मोकाट गुरांमुळे प्रवासी वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होऊन अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्याचे चिन्ह या गुरांच्या ठिय्यामुले दिसत आहे. तर गुरांचे मालक आहेत तरी कोण मालक घरी गुरे रस्त्यावर अपघात ग्रस्त मात्र कोमात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोकाट गुरांचे कलपच्या कळप या मार्गाच्या मधोमध काही उभे तर काही ठिय्या मांडून बसलेले असतात वाहन चालकांनी कितीही हॉर्न वाजवले तरी हलता हलत नाहीत त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे,

या महामार्गावर मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या मधोमध ठिय्या बसलेला आढळून येतो यामुळे प्रवासी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ  तसेच वाहन चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षितते च्या दृष्टीने जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या मोकाट गुरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होते.तर वाहन चालकांच्या घाईगडबीत अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यातच जर दुर्दैवाने एखाद्या गुराचा अपघात झालाच तर मालक वर्ग भरपाई मिळावी म्हणून क्षणाचा विलंब न करता धावत पळत येतो,परंतु आपल्या गुरांमुळें एखाद्याचे अपघाता मध्ये हात-पाय फ्रॅक्चर झाले तर गुरांचा मालक फिरकत सुध्दा नसल्याने अनेकदा समोर आले आहे.