मुख्‍यमंत्र्यांनी टोलवले ठाणेकरांचे जिव्‍हाळ्याचे प्रश्‍न, मालमत्‍ता करात सवलव व आर्थिक पॅकेजबाबत मौन

ठाणे : करानोचा प्रार्दुभाव एकीकडे कमी होत असतांना नागरिकांना दिलासा देणारे निर्णय न घेता आजच्‍या ठाणे भेटीत मुख्‍यमंत्र्यांनी पुन्‍हा एकदा करोनाष्‍टके म्‍हणत हजार बेडच्‍या कोविड इस्‍पीतळांचे लोकार्पण केले. करोना काळात सामान्‍य नागरिकांना व उत्‍पनाचे स्‍त्रोत आटलेल्‍या महापालिकांना थेट मदत करणारया निर्णयाबाबत मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी मौन बाळगले. मालमत्‍ता करात सवलत मिळावी व ठाणे महानगरपालिकेला आर्थिक पॅकेज मिळावे याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नांना मुख्‍यंत्री ठाकरे यांनी टोलवुन लावले.

ठाणे शहरात करोना रूग्‍णांची संख्‍या कमी होत आहे. मुंब्रा तर करोना मुक्‍त होत असल्‍याच्‍या जाहिराती पालिका करत आहे मात्र तरीही हजार खाटांचे कोविड हॉस्‍पीटल याचे लोकार्पण मुख्‍यंमत्री करीत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांना थेट दिलासा देणारे निर्णय मात्र प्रलंबित ठेवले आहेत. पुण्‍याला राज्‍य शासनाने आर्थिक पॅकेज दिले. तसेच पॅकेज ठाण्‍याला देखील मिळावे अशी मागणी भाजपा ठाणे शहर अध्‍यक्ष निरंजन डावखरे तसेच ठाण्‍याचे महापौर नरेश म्‍हस्‍के यांनी देखील केली मात्र याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नांना मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी उत्‍तर देण्‍याचे टाळले.

करोनानंतरचे दिवस सामान्‍य नागरिकांसाठी अधिक खडतर आहेत. अशावेळी मालमत्‍ता करात सवलत मिळावी अशी मागणी देखील होत असतांना याबाबतही मुख्‍यमंत्री यांनी मौन बाळगले. मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी आजच्‍या ठाणे दौरयात जिल्‍ह्यातील करोनाबाबत आढावा घेण्‍यात आला मात्र ठाणे, पालघर व एमएमआर विभागातील पालिकांना थेट आर्थिक मदत राज्‍य सरकारने दयावी याबाबत कोणतीही ठोस घोषणा केली नसल्‍याने याभागातील नागरिकांची घोर निराशा झाली.

ई पास बाबत राज्‍य शासन ठाम असुन जिल्‍हातंर्गत प्रवास ई पास काढूनच केला जाईल अशा आढमुठ्या भुमिकेचा पुर्नउच्‍चार ठाकरे यांनी ठाणे दौरा याच्‍या निमित्‍ताने आयोजित पत्रकार परिषदेत केला. ठाण्‍यातील खडयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावु तशा सुचना केल्‍या असल्‍याचे मुख्‍यमंत्री ठाकरे यावेळी म्‍हणाले. घाईघाईत दोन तीन प्रश्‍नांना उत्‍तर देत मुख्‍यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद अक्षरश गुंडाळली व ठाण्‍याकरांच्‍या जिव्‍हाळ्यांच्‍या प्रश्‍नांना टोलवुन लावले.