मुबंई-गोवा महार्गावर अपघातांची मालिका सुरूच, टुव्हीलर स्वारचा जागीच मृत्यू

Accident

कोलाड (श्याम लोखंडे ) : मुबंई गोवा महामार्गावरील आपघातांच्या प्रमाणात पुन्हा वाढ होत असून दिवसंदिवस या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली असून वाहतूक उपाय योजना दिवसंदिवस फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे ,

मागील आठवड्यात नागोठणे इंदापूर दरम्यान मोठे आपघात झाले या आपघात देखील इसम दगवल्याची घटना घडली असून पुन्हा पुन्हा अपघातांची मालिका सुरूच असल्याने प्रवासी नागरिकांच्यात एकच खळबळ माजली असून जीव टांगणीला लागला आहे त्यामुळे सुखकर प्रवास कधी सुरू होणार याकडे प्रवासी वर्गाचे डोळे लागल्याचे दिसत आहेत.  मुंबई -गोवा महामार्गावरील खांब जवळ सोमवार दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे टुव्हीलर स्वारचे जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली .

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार  मुंबई गोवा हायवे महामार्गावरील खांब नाक्यावर व रोहित धनवी यांच्या टपरी जवळ, पोटकाळाव्याच्या मोरी लगत कोलाड कडून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या ऍक्टिव्हा गाडी क्र. एम. एच.४६ ऐ. के.४२५२  टुव्हीलर स्वार अकबरअली अहमद कुमार वय ५५ वर्ष रा. बारापाडा ता. पनवेल जि. रायगड याला सदरच्या वाहनांनी धडक दिल्याने या धडकेमुळे टुव्हीलर स्वार याच्या डोक्याला व हाताला जबरदस्त मार लागल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाला असून याविषयी कोलाड पोलिस स्टेशन येथे  कोलाड पोस्टे गुरनं ०००६/२०२१भा.दं.वि.क.३०४ए २७९,३३८ वाहन अधिनियम १९८८,१८४,१३४प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून याविषयी कोलाड पोलिस  निरक्षक एस. ए. जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा.एस. बी. जाधव, एस.आर.माने अधिक तपास करीत आहेत.