पुणे : मुलांनो, तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका. मी राजकारणात आलोय. अडकलोय… कुठं जाताच येईना आणि बाहेरही पडता येईना, अशी प्रांजळ कबुली दादानी दिली. असं क्षेत्र निवडा ज्यातून जास्त आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमप्रसंगी अजित पवार बोलत होते, मी राजकारणात आहे. आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर… जनतेने सांगितलं तोपर्यंत! पण बघा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर राहतात. शिवाय त्यांचं प्रमोशन होत जातं, असेही अजितदादा पवार म्हणाले.