मॅक्सिकोच्या एका गुहेमध्ये प्रारंभिक काळातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले होते. यानंतर या प्राचीन गुफेत स्थानिक लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मॅक्सिकोच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एंथ्रोपोलॉजी अँडी हिस्ट्रीने म्हटले आहे की, जाकाटेकास राज्यातील सुदूर चिकिहुइटेव गुहेत पर्यटकांना आता प्रवेश करण्यास मनाई केली आहे. या शोधामुळे मानवी इतिसासाबाबत नवीन माहिती समोर येऊ शकते.
संस्थेच्या वैज्ञानिकांनी सांगितले की गुहेच्या तळात प्रारंभिक काळातील मनुष्याचे डीएनए आढळतात का त्याचा शोध घेतला जात आहे. डीएनए हजारो वर्ष संरक्षित राहतात. ही गुहा जाकाटेकास येथील एका डोंगरावर आहे. हिमयुगातील प्रसिद्ध गुहेप्रमाणे मात्र येथे मनुष्याच्या उपस्थितीचे दगडांवर पेटिंग, चूल, प्राण्यांची हडे असे पुरावे नाहीत.
नेचर पत्रिकेत प्रकाशित लेखानुसार, गुहेत आढळलेले दगडांची हत्यार सांगतात की जवळपास 26,500 वर्षांपुर्वी उत्तर अमेरिकेत लोक राहत होती. हे वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार जवळपास 10 हजार वर्ष आधी आहे. येथे दगडांपासून बनलेले अनेक हत्यार आणि त्याचे अवशेष सापडले आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी लोक गुहेचा वापर करत असतील असा अंदाज आहे. मात्र अद्याप वैज्ञानिकांना येथे कोणत्याही मनुष्याचे डीएनए आढळलेले नाहीत.