पनवेल (संजय कदम) : जेएनपीटी पनवेल महामार्गावर टी पॉईंटजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये अरबाज कुडुम या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पनवेलमध्ये राहणारा अरबाज कुडुम जेएनपीटीमध्ये खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. रात्री कामावरून घरी परत येत असताना टी पॉईंट साई ढाब्याजवळ त्याच्या मोटारसायकलला वाहनाने धडक दिली.
त्याला उपचारासाठी पनवेल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.