पनवेल : पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या 4 नगरसेवकांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये पनवेल विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार असलेल्या हरेश केणी यांचा समावेश आहे. शेकापसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
निवडणुकीनंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद देण्याचे आश्वासन शेकापने किणी यांना दिले होते, परंतु या अश्वासनाचे पालन पक्षाने न केल्याने केणी नाराज होते. हरेश केणी यांच्यासोबत हरेश केणी यांचे बंधू दिनेश केणी यांनी आपल्या समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.