मोदी सरकार महाराष्ट्रातील नेरळ-माथेरानसह चार हेरिटेज रेल्वे मार्गांचं खासगीकरण करण्याच्या तयारीत

modi1

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वे मार्गासह चार अन्य मार्गांचं खासगीकर करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलं आहे. यामध्ये नेरळ-माथेरान यासह हिमाचल प्रदेशमधील हेरिटेज दर्जा असलेला कालका-शिमला रेल्वे मार्ग, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी-दार्जिलिंग आणि तामिळनाडूतील नीलगिरी या रेल्वेमार्गांचं खासगीकरण करण्यात येणार आहे. या मार्गांवर वर्षाला १०० कोटी रूपयांचं नुकसान होत असल्यानं या मार्गांच खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

या ट्रेनची देखभाल करण्यासोबतच मार्केटिंग करण्याचंही काम खासगी संस्था करणार आहेत. याव्यतिरिक्त नव्या ट्रेनदेखील या मार्गांवर चालवण्यात येतील. या संस्थांना यातून जो महसूल मिळेल त्यातील काही भाग रेल्वेलाही दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त रेल्वेनं चारही मार्गांचं अध्ययन आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मोडवर देण्याची जबाबदारी रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीला सोपवली आहे. सध्या या मार्गिकेंचं अध्ययन सुरू करण्यात आलं आहे. तसंत संस्थांना कोणत्या अटी शर्थींवर ही जबाबदारी सोपवायची आहे याची माहिती ही संस्था चार महिन्यांत देईल. सद्यस्थितीत या मार्गांवर ट्रेन चालवण्यासाठी रेल्वेकडे बजेट नाही. अशातच हे मार्ग आता खासगी कंपन्यांकडे सोपवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.