मोफत शिक्षण, संशोधन आणि रोजगाराचे धडे, ग्लोबल मिशन अ‍ॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटरचा उपक्रम

कोलाड (श्याम लोखंडे ) : ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर (Gov. Reg) च्या वतीने सक्षम शिक्षक- सक्षम विद्यार्थी आणि सक्षम कुटुंब – सक्षम राष्ट्र या अभियानाची सुरुवात दि: 5 सप्टेंबर 2020, रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील मौजे चिल्हे  येथून करण्यात आली.
ही संस्था खगोल विज्ञान या विषयावर गेले 5 वर्षांपासून ग्रामीण भागातील गावपातळीपासून ते आतंरराष्ट्रीय स्तरावर काम करीत आहे. संस्था  अमेरिका व युरोप येथील संस्थांबरोबर संलग्न आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना यातून  संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे.
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे ठीक दुपारी 4 वा या वेळेत ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष व खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांच्या शुभहस्ते व्हिडीओ कॉन्फरस व झूम ऍप द्वारे  www.global-astronomy.org या  संकेतस्थळाद्वारे शुभारंभ करण्यात आला. या संकेत स्थळावर  शेकडोहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रथमच सहभाग नोंदवत याची माहिती घेत अनेकांनी याचा लाभ घेतला.
ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून *सक्षम शिक्षक – सक्षम विद्यार्थी* यांना मोफत मार्गदर्शन व शिक्षणाचे धडे  तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, त्यांची बुद्धिमत्ता व त्यांचा आवडता छंद व आवडत्या शिक्षणाची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार  तर पी जी आय क्लब इंडिया यांच्या माध्यमातून *सक्षम कुटुंब – सक्षम राष्ट्र* यांच्या वतीने युवा पिढीला रोजगार व व्यवसाय कसा करता येईल या विषयाचे मार्गदर्शन होतकरू युवा पिढीला होणार आहे.
सदर लिंक व वेबसाईटच्या माध्यमातून,
1) खगोल विज्ञानाचे उपक्रम, नियोजन व कार्यवाही.
2)अवकाश निरीक्षण व संशोधन.
3) विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण.
4) उत्कृष्ट सहभाग व काम करणाऱ्या प्रतिनिधींना मानधन व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा करण्याची संधी देखील या उपक्रमातून प्राप्त होणार आहे.
ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे पदाधिकारी संस्थापक व अध्यक्ष- विशाल कुंभारे (खगोलशास्त्रज्ञ).
उपाध्यक्ष- अशोक वाकचौरे.
सचिव- डॉ. प्रसाद खंडागळे.
सहसचिव- महादेव पालक.
खजिनदार- रागिणी वाकचौरे.
संचालक- बिशप तुलसी.
संचालिका- मंगल वाकचौरे.
यु.के.पी.एल. चे सेंसुई राजीव सिन्हा.डॉ.संजय बन्सल, डॉ.वाघमारे (आयुक्त,मुंबई), जनार्धन पेडामकर-अध्यक्ष- योगदान मंच, श्रीमती. पेठे – न्यायिक लढा पत्रकार संघ.
दीपक दळवी-संपादक-दै.जनामुद्रा तसेच
राज्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक व विविध स्तरावरील मान्यवरांनी सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.