मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक 6 महिन्यांनी सुरू

उरण : कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक गुरुवार, ३ सप्टेंबरपासून सुरू झाली. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्याच्या अटींवर प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी असल्याचे मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी सांगितले.

ही सेवा पावसाळी हंगामात जून ते ऑगस्ट बंद असते. या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद केली होती. ही सेवा अखेर ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्म्या प्रवाशांसह दररोज परतीच्या एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.