कोलाड ( श्याम लोखंडे) : जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा येथिल धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. अॅड. सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींना २८जानेवारी रोजी दमखाडी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कै.सूर्यकांत वढावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच करोना कालावधी मध्ये कामगार, नातेवाईक ज्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला संघटनेचे नेते अनंत देशमुख, संघटक सचिव सुहास खरीवले,खेळू वारगे,सोल्वे कंपनीचे कमेटी अध्यक्ष मंगेश कदम,बेक कमेटी परशुराम माहबले, कोर्स कमेटी अध्यक्ष राकेश बामुगडे, दिपक नायट्रेड कमेटी अध्यक्ष सुनील आब्रुसकर यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला सर्व कामगार कमेटी मेबंर्स उपस्थित होते.