‘या’ २ पद्धतीने तयार करा लिंबाच्या सालीचा लेप, ‘हे’ ३ आरोग्यदायी फायदे

लिंबाचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. आपल्याकडे जेवणावर लिंबू आणि कांदा सेवन केला जातो. कारण लिंबाचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. लिंबाचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा शरीराला चांगला लाभ होतो. लिंबाचा सरबतही सेवन केला जातो. परंतु, प्रत्येकवेळी लिंबू पिळून त्याच्या रसाचाच वापर केला जातो. लिंबूच्या रसाऐवढेच गुणधर्म त्याच्या सालीतही असतात. सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. या सालीचा लेप सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकतो. हा लेप कसा तयार करावा, व त्याचे कोणते उपयोग आहेत जाणून घेवूयात.

असे तयार करा लेप

१ लिंबाच्या केवळ सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. एका कापड्याने त्याठिकाणी हलकेसे बांधा. दोन तासानंतर लेप काढून टाका.

२ एका काचेच्या भांड्यात लिंबूच्या साली घ्या. त्यामध्ये तीन ते चार चमचे ऑलिव्ह ऑईल टाकून भांडे झाकून ठेवा. पंधरा दिवस साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. थोड्याने वेळाने पाण्याने स्वच्छ धुवून काढा.

हे आहेत फायदे
१ यातील व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियममुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
२ आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी आहे. वरील उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
———————————–
Natural remedies for kidney stones that really work
अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

किडनी स्टोनच्या वेदना असह्य असतात. पोटात आणि पाठीमागच्या बाजूला होत असलेल्या या वेदना सहन करणे त्रासदायक ठरतात. सतत लघवीला जाणे, शौचाला त्रास होणे, जास्त घाम येणे आणि उलटी होणे, असाही त्रास होतो. किडनी स्टोनवर काही औषधेसुद्धा उपलब्ध असून ऑपरेशन करुनही तो काढला जातो. काही घरगुती उपाय केल्यास या समस्येतून आराम मिळू शकतो. हे घरगुती उपाय जाणून घेवूयात.

हे उपाय करा

१ व्हीट ग्रास
व्हीट ग्रास पाण्यात उकळून थंड करून ते पाणी नियमित सेवन करावे. यात थोडा लिंबाचा रस मिसळल्यास आणखी फायदा होतो.

२ राजमा
राजमा किडनी आणि ब्लेडरच्या आजारांवर फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवाल ते पाणी प्यायल्यानेही फायदा होतो.

३ कलिंगड
किडनी स्टोनवर कलिंगड खुपच उपयुक्त आहे. यातील पोटॅशिअममुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर जाऊ शकतो.

४ लिंबू रस आणि ऑलिव्ह ऑइल
समप्रमाणात लिंबू रस आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण गॉलब्लेडरच्या स्टोन व किडनी स्टोनवरही फायदेशीर आहे. यामध्ये स्टोनला तोडण्याची क्षमता असते. पुन्हा स्टोन तयार होत नाही. दिवसातून तीन वेळा हे मिश्रण सेवन करा.

५ डाळिंब
किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावे अथवा रस घ्यावा. हे फ्रूट सॅलडमधूनही खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *