उरण (विठ्ठल ममताबादे) : युवा संकल्प पॅनल जसखार यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक २०२२ साठी १ सरपंच तसेच ११ ग्रामपंचायत सदस्य यांचे निवडणूक अर्ज दाखल करून त्याची यशस्वी छाननी निवडणूक अधिकारी यांच्या समवेत झाली.
जसखार मधील सर्व राजकीय पक्ष एका बाजूला व दुसऱ्या बाजूने पक्ष विरहित युवा सामाजिक संस्था अशी लढत होणार आहे युवा सामाजिक संस्था प्रणित युवा संकल्प पॅनल च्या सर्व उमेदवारी अर्जावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला परंतु सर्व कागदपत्रे योग्य तपासणी करून सर्व अर्ज वैद्य ठरविण्यात आले म्हणून हि निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
युवा सामाजिक संस्था मागील २ वर्षापासून केलेल्या कामाच्या पाठ पुराव्यामुळे ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा सर्व युवा संकल्प सदस्य पदाच्या उमेदवारांना मिळत आहे या निवडणुकीत सरपंच सहित सर्व सदस्य भरघोस मतांनी निवडून येतील अशी आशा युवा सामाजिक संस्था च्या वतीने अमित ठाकुर यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच पदासाठी मंजुळा महेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरला असून वार्ड निहाय उमेदवार खालीलप्रमाणे
वॉर्ड क्रमांक १
१)अमित कमलाकर ठाकूर
२) धनवंती दिनेश ठाकूर
वॉर्ड क्रमांक २
१) रंजित नरेश पाटील
२) सिमा रवींद्र ठाकूर
३) वैजयंती निशांत ठाकूर
वॉर्ड क्रमांक ३
१)सचिन हरिश्चंद्र घरत
२) दमयंती जनार्दन म्हात्रे
३)प्रणाली किशोर ठाकूर
वॉर्ड क्रमांक ४
१)संदीप धनंजय भोईर
२)मनीष प्रदीप म्हात्रे
३)हेमलता भालचंद्र ठाकूर
हे सर्व उमेदवार आता निवडणूक रिंगणात उतरले असून हे सर्व सदस्य जसखार मधील युवा सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेचे युवा संकल्प पॅनल जसखारचे उमेदवार आहेत.