चौक : (मंगेश जाधव) : रंगायन प्रतिष्ठान खोपोली या नाट्य संस्थेमार्फत रविवार, दि. १८-१२-२०२२ रोजी आंतरशालेय “एकपात्री अभिनय” आणि “स्किट” स्पर्धेच आयोजन केले होते या स्पर्धेच द्वीप प्रज्वलन व रंगमंच पूजन मा.श्री. कुलदीपक शेंडे, मा.श्री.हरीश काळे, मा.श्री. संदीप पाटील, मा.श्री.रवींद्र घोडके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे-अध्यक्ष सतीश येरुणकर, उपाध्यक्ष – केतन खोपकर, सचिव – संजय म्हामुणकर, प्रशासकीय अधिकारी – कविता खोपकर मॅडम, सिनेअभिनेते – भूषण घाडी, लेखक – दिग्दर्शक मनोज येरुणकर, रंगायचे जेष्ठ कलाकार – गजानन गोरे, खजिनदार – संकेत पाटील, सह सचिव – प्रथमेश पाटील, तसेच सभासद – तन्वीर शेख, संदीप ढवळे, कल्पेश गुरव आणि सर्व हौशी कलाकार उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये जनता विद्यालय प्राथमिक, जनता विद्यालय माध्यमिक, शिशु मंदिर, वसंत देशमुख स्कूल,आनंद शाळा, जे.सी. एम.एम. स्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी सिनेअभिनेते भूषण घाडी, मा. श्री.रवींद्र घोडके आणि रंगायचे जेष्ठ कलाकार गजानन गोरे हे परीक्षक म्हणून लाभले होते.
एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये १ली ते ६ वी शिशु गटात प्रथम क्रमांक आस्था नडवीरमणी, द्वितीय क्रमांक मुग्धा कुलकर्णी व तृतीय क्रमांक विभागून वीरा महाजन व स्वरा मोरे यांना देण्यात आला. तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक आदर्श रामानंद सिंग व द्वितीय क्रमांक युसूफ खंडालावाला यांना देण्यात आला. स्किट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिशु मंदिर स्कूल व द्वितीय क्रमांक जे सी एम एम स्कूलला देण्यात आला.