उरण (विठ्ठल ममताबादे) : शरीर सौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सुपुत्र रमेश पाटील यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत अनेक गोल्ड मेडल पटकाविली आहेत त्यांना उत्कृष्ट कामगिरी मूळे महाराष्ट्र श्री गोल्ड मेडल,द्रोणागिरी श्री टायटल चैम्पियन ऑफ चॅम्पियन, वेलर क्लासिक क्रमांक 5 असे अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आता त्यांची निवड मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे.
रमेश पाटील हे स्टॉम फिटनेस कोप्रोली येथे व्यायामाचे, फिटनेसचे ट्रेनिंग घेत आहेत. रमेश पाटील यांना आर्यन पाटील,आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर तथा कोच सिद्धेश शिंदे,निशिकांत घरत, अशीष पाटील, अनिकेत पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते. रमेश पाटील यांना घडविण्यासाठी तसेच स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कोच सिद्धेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
रमेश पाटील यांची निवड मि.इंडियांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी झाल्याने जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच अनेक जणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून रमेश पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.