उरण (विठ्ठल ममताबादे ) : 32 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे जनजागृती व्हावी या उद्देशाने उरण येथे मोटार सायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरिक्षक श्री.दिनेश बागुल, श्री.धनराज शिंदे,श्री.सचिन पोलादे तसेच उरण येथील श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कुल,उरण मोटार ट्रेनिंग स्कुल,श्री.हरिहरेश्वर मोटार ट्रेनिंग स्कुल, श्री.गणेश मोटार ट्रेनिंग स्कुल, श्री.राघोबा मोटार ट्रेनिंग स्कुल चे संस्थापक तसेच मोटार सायकल स्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वाहन चालकांना हेल्मेटचे महत्व समजवण्यात आले.तसेच केअर पाॅईंट हाॅस्पिटल ते उरण चारफाटा अशी मोटार सायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली.राज्यात सर्वत्र हे अभियान राबविले जात असून उरण मध्येही या रस्ते सुरक्षा अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.